सेट अप
विद्यार्थ्यांना जोड्यांमध्ये, लहान गटांमध्ये विभाजित करा किंवा संपूर्ण वर्गाची चर्चा म्हणून हे घ्या.
प्ले
एक व्यक्ती एक विधान करते आणि गटातील इतर खेळाडू ती व्यक्ती खोटे बोलत आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. ती व्यक्ती विधान खरे आहे असे मानून करते, परंतु ते विधान कधीकधी खोटे असले पाहिजे; म्हणजेच, त्या विधानाला काही प्रति-उदाहरणे असली पाहिजेत.
सामान्यतः, लोक दोन प्रकारची विधाने वापरतात: एक म्हणजे “वस्तुस्थिती” सांगणारी सर्वसाधारण विधाने, आणि दुसरे म्हणजे “जर __, तर ___ ” या स्वरूपाची विधाने. दोन्ही प्रकारच्या विधानांची उदाहरणे या पानाच्या शेवटी पहा.
ध्येय
सहजासहजी न सापडणारी प्रतिउदाहरणे शोधण्यासाठी एकमेकांना आव्हान द्या.
गणिताच्या संकल्पना
तर्क, प्रतिउदाहरणे
साहित्य
काहीही नाही
खेळाडू
जोड्या, लहान गट किंवा संपूर्ण वर्ग