युद्ध – गुणाकार
गणिताच्या संकल्पना
एक-अंकी संख्यांचा गुणाकार
साहित्य
पत्त्यांचा संच
खेळाडू
2
सेट अप
पत्त्यांच्या संचातून चित्र असलेले पत्ते काढून टाका. पत्ते पालथे ठेवून त्यांचे समान दोन ढिग करा, प्रत्येक खेळाडूसाठी एक.
प्ले
प्रत्येक ढिगाऱ्यातील वरचे दोन पत्ते उलटून घ्या आणि प्रत्येक पत्त्यांच्या जोडीचा गुणाकार करा. ज्या खेळाडूचा गुणाकार जास्त असेल, तो सर्व चार पत्ते स्वतःकडे ठेवतो. खालील उदाहरणात, उजवीकडील खेळाडू ४ x ८ = ३२ गुणांसह जिंकतो, तर डावीकडील खेळाडूचा गुणाकार १ x ६ = ६ आहे. जर गुणाकार जुळला, तर पत्त्यांच्या पुढील दोन जोड्या उलटून घ्या आणि जिंकणाऱ्याला सर्व आठ पत्ते मिळतात.

ध्येय
एक किंवा अधिक वेळा सर्व पत्ते वापरून झाल्यावर ज्या खेळाडूकडे सर्वात जास्त पत्ते असतील तो विजेता ठरतो.
चर्चा आणि सूचना
तुम्ही पत्त्यांचा संच किती वेळा पलटणार आहात किंवा किती वेळ खेळणार आहात, हे आधीच ठरवा.